Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रादेशिक परिवहन विभागाकडून नागरिकांकरीता रुग्णवाहिकेचे दर निश्चित

Get real time updates directly on you device, subscribe now.

जादा दर आकारल्यास गुन्हा नोंदविणार- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. 29 एप्रिल: रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्चित करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या सुचनांच्या अनुषंगाने व परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निर्देशाप्रमाणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेऊन रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्चित केले आहेत. यानुसार पहिले 25 किलोमीटर अंतर अथवा 2 तास यासाठी मारूती व्हॅन करिता 800 रुपये व त्यापुढील प्रत्येक किलोमीटर साठी 15 रुपये, टाटा सुमो व मॅटॅडोर सदृष्य वाहनाकरिता पहिल्या 25 किलोमीटरसाठी 900 रुपये व त्यापुढील प्रत्येक किलोमीटर साठी 15 रुपये, टाटा 407, स्वराज माझदा इ. साठी रु. 1200 व रु. 18 प्रती कि.मी., आय.सी.यू. अथवा वातानुकूलित वाहनाकरिता रु. 2000 व रु.25 प्रती कि.मी. याप्रमाणे रुग्णवाहिकेचे दर ठरविण्यात आले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जे वाहन चालक व मालक विहीत भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणी करतील, त्यांचेवर पहिल्या गुन्ह्यासाठी रुपये पाच हजार, दुसऱ्या गुन्ह्यासाठी रुपये दहा हजार व तिसऱ्या गुन्ह्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद घेण्यात येईल.

नागरिकांनीही उपरोक्त ठरविलेल्या दरापेक्षा अधिक भाडे देऊ नये व याबाबत काही तक्रारी असल्यास उप प्रादेशिक परिवहन कार्यालयास लेखी स्वरूपात किंवा mh३४@mahatranscom.in या ई-मेल पत्त्यावर तक्रार सादर करण्यात यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.