Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आलापल्ली येथील अमीत येनप्रेड्डीवार यांची माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्य गडचिरोली जिल्हा युवक अध्यक्षपदी निवड.

Get real time updates directly on you device, subscribe now.

आलापल्ली, दि. १० डिसेंबर: माहिती अधिकार कार्यकर्ता असोसिएशन पंजिकृत माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष साईनाथ नागनाथ शिंदे यांच्या तर्फे आलापल्ली येथील अमीत राजू येनप्रेड्डीवार यांचे माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्य गडचिरोली जिल्हा युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त अतिदुर्गम क्षेत्रांनी व्यापलेला आहे. अनेक अतिसंवेदनशील क्षेत्र आहे जिथे माहिती अधिकार अधिनियम कायद्याच्या अपूर्ण माहिती आणि अभ्यास नसल्याकारणाने अनेक लोक आपल्या दैनंदिन जीवनात भ्रष्टाचारी लोकांचे बळी पडत आहे याच गोष्टीची दखल घेत माहिती अधिकार अधिनियम कायद्याचे प्रचार प्रसार करून नागरिकांना कायद्या विषयी जागरूक करण्या करीता अतिशय प्रामाणिक सक्षम अश्या आलापल्ली येथील अमीत येनप्रेड्डीवार यांचे माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्य गडचिरोली जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.