Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दारु वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना अपघात; सीमा शुल्क विभागाचा चालक ठार

२ पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई, 07 जुले – नाशिक जिल्ह्यात अवैधरित्या दारूची वाहनातून तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सीमा शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचत दारू वाहतूक करणारे वाहन दिसल्यानंतर पथकाने गाडी पकडण्यासाठी पाठलाग सुरु केला. मात्र पाठलाग करताना सीमा शुल्क विभागाच्या वाहनाचा अपघात होऊन सीमा शुल्क विभागाच्या वाहनवरील चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर लासलगाव पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. चांदवड- लासलगाव रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास दारूची अवैधरित्या वाहतूक केली जात असलेल्या वाहनाची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. दारू जप्त करण्याच्या अनुषंगाने सीमा शुल्क विभागाच्या पथकाने पोलिसांना माहिती दिली.

त्यानुसार पथकाने चांदवड- लासलगाव रस्त्यावर सापळा रचला होता. सीमा शुल्क विभाग तसेच लासलगाव पोलीस यांच्या वतीने संयुक्त कार्यवाही करण्यासाठी सीमा शुल्क विभागाच्या वाहनातुन पाठलाग सुरु केला. गाडी अनियंत्रित होऊन पलटी दरम्यान गाडीचा पाठलाग करत असताना सीमा शुल्क विभागाचे वाहन चांदवड तालुक्यातील हरणुल या ठिकाणी शेतात जाऊन पलटी झाले. त्यात सीमा शुल्क विभागाचे चालक कैलास कसबे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे व निकम हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.