Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्ह्यातील तरुण-तरुणींना व्यावसायिक पायलट होण्याची संधी राज्य शासनाकडून 90 टक्के अनुदान प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची मुदत 16 ऑगस्टपर्यंत

10 विद्यार्थ्यांना व्यावसायिक पायलट परवाना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर – नागपूर फ्लाईंग क्लब अंतर्गत चंद्रपूर फ्लाईंग स्टेशन समितीच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील 12 वी उत्तीर्ण (गणित व भौतिकशास्त्र या विषयासह) झालेल्या 10 विद्यार्थ्यांना व्यावसायिक पायलट परवाना (कर्मशिअल पायलट लायसन्स) प्रशिक्षणाकरीता विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे. या प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना राज्य शासनाकडुन 90 टक्के अनुदान (अंदाजे 37 लक्ष) रुपये प्राप्त होणार असून उर्वरित 10 टक्के रक्कम (अंदाजे 4 लक्ष) रुपये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी स्वत: भरावयाची आहे. य बाबतचा अधिक तपशील व अर्जाचा नमुना www.chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

प्रक्रियेचा कालावधी : अर्ज सादर करावयाचा कालावधी 29 जुलै ते 16 ऑगस्ट 2024 पर्यंत, परिक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देणे 23 ऑगस्ट 2024, लेखी परीक्षा 1 सप्टेंबर 2024 रोजी, लेखी परीक्षेचा निकाल परिक्षा संपल्यानंतर, जिल्हा समितीद्वारे कागदपत्र पडताळणी 3 सप्टेंबर 2024 रोजी.
परीक्षा शुल्क : प्रत्येक विद्यार्थ्यास ऑनलाईन पेमेंट पध्दतीने 1 हजार रुपये शुल्क आकारण्यात येईल.
लाभार्थी/ उमेदवार निकष : 1) उमेदवार महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असावा/असावी.
2) उमेदवाराची वयोमर्यादा किमान 18 वर्षे ते 28 वर्षे (1.1.2024रोजी) 3) 12 वी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,गणित हे विषय घेऊन अनुसुचित जमाती करीता किमान 65 टक्के गुणासह व अमागास करीता किमान 75 टक्के गुणासह प्राप्त करून पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेला /झालेली उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे : महाराष्ट्र राज्याचे विशेषत: चंद्रपूर जिल्ह्यातील डोमीसाईल (अधिवास) प्रमाणपत्र, जन्मतारखेचा दाखला, 10 वी व 12 वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र व मार्कशिट, मुख्याध्यापक / शाळेचे प्राचार्य/ राजपत्रित अधिकारी यांनी दिलेले चारित्र्याचे प्रमाणपत्र, चंद्रपूर जिल्ह्याचे स्थानिक रहिवासी असल्याबाबतचे तहसिलदार यांचे रहिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड, अनुसुचित जमातीचे प्रवर्गाकरीता जातीचे प्रमाणपत्रव जात वैधता प्रमाणपत्र, अंतिम प्रवेशपात्र झालेल्या उमेदवारांनी DGCA Approved Medical Practitioner यांचे कडून वैद्यकीय प्रमाणपत्र व पोलीस विभागाकडून चारित्र्याचे प्रमाणपत्र प्राप्त करून सादर करणे आवश्यक राहील.

ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

1) प्रस्तुत पदांकरिता फक्त http://chandaflying.govbharti.org या अधिकृत संकेतस्थळावरून विहित पध्दतीने भरलेले ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील व इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. 2) सदर संकेत स्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी स्वत: उमेदवाराची राहील. 3) ऑनलाईन अर्ज करतांना, शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे. तथापि, ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांची पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. 4) ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना http://chandaflying.govbharti.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 5) ऑनलाईन पध्दतीने अर्ज करताना स्वत:चा अद्यावत विहीत नमुन्यातील पासपोर्ट फोटो व सही स्कॅन करून http://chandaflying.govbharti.org मधील सुचनेनुसार ‍विहीत पध्दतीने अपलेाड करणे अनिवार्य आहे. 6) ऑनलाईन अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांक व वेळेनंतर अर्ज भरण्याची लिंक बंद केली जाईल. 7) निवड झालेल्या उमेदवाराने कागदपत्रे पडताळणीस स्वत: उपस्थित राहावे. 8) अर्जदाराने भरतीप्रक्रियेदरम्यान राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास अशा उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल.

जिल्हा उपसमिती, चंद्रपूर फ्लाईंग स्टेशन यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेमधून गुणानुक्रमे उमेदवारांची निवड करण्यात येईल. वरील निवड प्रक्रियेमध्ये बदल करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, चंद्रपूर तथा अध्यक्ष जिल्हा उपसमिती, चंद्रपूर फ्लाईंग स्टेशन समिती यांना राहतील, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

जिल्ह्यातील 95 रुग्णांची कॅन्सरपासून मुक्तता 62 हजार नागरिकांची कॅन्सरची तपासणी

Comments are closed.