Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अंजली दमानिया यांचे आरोप खोटे, धनंजय मुंडे स्पष्ट बोलले

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

Dhananjay Munde On Anjali Damania :  सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचा कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचाराचा घोटाळा उघड केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याच्या आरोपानंतर आता धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळले आहेत. माझं मीडियाला चॅलेंज आहे. अंजली बदानमियांनी.. बदनामी करण्यापलिकडे एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात देशात कुठे तरी टिकलाय का. सत्य झाला का? असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केला.

धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री असताना जवळपास 245 कोटींचा घोटाळा केल्याचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी  केला होता. दमानिया यांच्या या आरोपांना आता धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे. अंजली दमानिया यांनी केलेले आरोप धादांत खोटे आहेत. त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणारे हे आरोप आहेत, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जली दमानिया यांनी ज्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेतला ती निविदा प्रक्रिया नियमाप्रमाणे आणि शासनाच्या धोरणाला अनुस्वरुनच राबवली गेली होती. मागील अनेक दिवसांपासून त्या वेगवेगळे आरोप करत आहेत. त्यातला एकही आरोप आतापर्यंत सिद्ध झालेला नाही, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

महाराष्ट्रातील जनता हे सर्व पाहत आहेत. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांपैकी फरार आरोपीची हत्या झाल्याचाही आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. असे सनसनाटी आरोप करायचे आणि स्वत:ची प्रसिद्धी करायची आणि दुसऱ्याची बदनामी करायची. आज केलेल्या आरोपांतही मला दुसरं काही आढळून येत नाही. आज 58 वा दिवस आहे माझ्यावर मीडिया ट्रायल सुरु आहे. का सुरु आहे? कोण चालवतंय मला माहिती नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.