Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कृषी पुरस्कार २०२० साठी प्रस्ताव सादर करण्याचे राज्यातील शेतकऱ्यांना आवाहन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पालघर : राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात अति उल्लेखनिय कार्य करणा-या शेतक-यास अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे..

त्यानुसार शेती अथवा पुरक क्षेत्रात अति उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी अथवा शेतकरी गट / संस्था यांना “महाराष्ट्र शासनाच्या” कृषी विभागामार्फत विविध कृषी पुरस्कार सन 2020 करिता इच्छुकांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत केले आहे..

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शेती क्षेत्राशी संबंधित खालील तपशिलाप्रमाणे विविध पुरस्कार मा.राज्यपाल, यांच्या हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात येते.

पुरस्कारांचे स्वरूप पुढील प्रमाणे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

१) डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार ०१ (राज्यातून एक) ७५,००० रुपये

२) वसंतराव नाईक कृषि भुषण पुरस्कार – ०८ (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ०८) ५०,००० रुपये

३) जिजामाता कृषिभुषण पुरस्कार ०८ (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ०८) ५०,००० रुपये

४) कृषि भूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार ०८ (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ०८) ५०,००० रुपये

५) युवा शेतकरी पुरस्कार ०८ (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ०८) ३०,००० रुपये

०६) वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार ०८ (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ०८) ३०,००० रुपये

०७) उद्यान पंडीत पुरस्कार ०८ (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ०८) २५,००० रुपये

०८) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार ४० (सर्वसाधारण गटासाठी प्रति जिल्हा १ याप्रमाणे ३४ आणि आदिवासी गटासाठी प्रति विभाग ०१ याप्रमाणे ०६ असे एकूण ४०) ११,००० रुपये

०९) पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार ०९ (आठ कृषि विभागातून प्रत्येकी ०१ अधिकारी/कर्मचारी याप्रमाणे- ०८ तसेच कृषि आयुक्तालय स्तरावरून एक अधिकारी/कर्मचारी याप्रमाणे एकंदर एकूण-०९) –

यावर्षी विविध कृषी पुरस्कारांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली असुन काही अंशी निकषामध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनिय व नाविन्यपुर्ण कामगिरी करणाऱ्या युवा शेतकऱ्यांसाठी राज्यातील प्रत्येक कृषी विभागातुन एक याप्रमाणे एकुण ०८ युवक शेतकऱ्यांना “युवा शेतकरी पुरस्कार” ह्या वर्षापासून नव्याने देण्यात येणार आहेत याबाबतचा शासन निर्णय क्रमांक कृपु-2020/ प्र.क्र12/4अे, मंत्रालय मुंबई-32, दि.15 फेब्रवारी 2021 प्रसिद्ध झाला आहे.

यानुसार सर्व शेतकरी, शेतकरी गट/संस्था यांना कृषि विभागामार्फत आवाहन करण्यात येते की, मार्गदर्शक सुचनांच्या अधिन राहुन कृषि पुरस्कारासाठीचा आपला परीपुर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयात दिनांक ३० जुन पर्यंत सादर करावा.

तसेच विविध कृषि पुरस्कारांच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक / कृषी पर्यवेक्षक / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन आयुक्त (कृषी) यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.

हे देखील वाचा :

लॉकडाऊनचे नियम तोडून विवाह करणाऱ्या वधु पित्यावर ५० हजार रुपयाचा दंड

https://loksparsh.com/maharashtra/this-year-kharif-planning-on-157-lakh-hectare-area/14879/ .

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.