माजी उपसरपंच व रोजगार सेवकानी ग्रामपंचायत कार्यालयातील घरकुलाच्या फाइल्स चोरीचा आरोप
सरपंच, उपसरपंच, सदस्य यांची पोलीस स्टेशन व पंचायत समितीमध्ये तक्रार दाखल
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुल, 2 ऑगस्ट 2023 ; बेंबाळ ग्रामपंचायत कार्यालयामधील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतील फाइल्स सुरक्षित ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ठेवले असताना ग्रामपंचायत कार्यालयातीलच रोजगार सेवक गोविंदा कोम्मावार रा. बेंबाळ तसेच मुन्ना कोटगले भाजपा पदाधिकारी तथा माजी उपसरपंच रा. बेंबाळ यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील फाइल्सची परस्पर चोरी केल्याचा आरोप ग्रामपंचायत सरपंच चांगदेव केमेकार, उपसरपंच देवाची परिवार तथा ग्रामपंचायत सदस्यांनी केली.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सांगण्यानुसार परस्पर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन कोणालाही विचारपूस न करता फाईलची सदर इसमांनी चोरी करून हडप केलेले आहे असे सांगितले. ग्रामपंचायत कार्यालयातील फाईल कोणत्याही जबाबदार पदाधिकारी व ग्रामसचिवाला न विचारता परस्पर चोरी करून नेणे हा गंभीर गुन्हा असून सदर व्यक्तिंची तात्काळ चौकशी करून जर दोषी आढळल्यास गंभीर गुन्हा दाखल करावा व ग्रामपंचायत कार्यालय कर्मचारी तथा रोजगार सेवक गोविंदा कोमावार यांचेवर प्रशासकीय कारवाई करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी सरपंच, उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.
हे पण वाचा :-
Comments are closed.