Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना करीता अर्ज आमंत्रित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली : सन 2024-25 मध्ये राज्यस्तरीय भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीकरीता राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत मेंढयाकरीता चराई अनुदान देणे, मेंढीपालनाकरीता जागा खरेदी करीता अनुदान देणे व 1000 कुक्कूट पक्षींची खरेदी व संगोपनाकरीता अर्थसहाय्य करणे या योजना राबविणेकरीता मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत ऑनलाईन लाभधारक निवड प्रक्रिया राबविणे, लाभार्थी निवड समिती मार्फत लाभार्थीची प्राथमिक निवड करणे, निवड झालेल्या लाभार्थ्याकडुन कागदपत्रे अपलोड करुन घेणे, विविध स्तरावरुन कागदपत्रांची छाननी करणे व लाभार्थी निवड समिती मार्फत अंतिम निवड यादी तयार करणे या करीता www.mahamesh.org या नावाने वेब अप्लिकेशन तयार करण्यात आलेले आहे.

www.mahamesh.org या नावाने तयार करण्यात आलेल्या वेब / अंड्रोइड अप्लिकेशनच्या माध्यमातुन ऑनलाईन अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे. अर्जदार नोंदणी व योजनेसाठी अर्ज मागविणे 12 सप्टेंबर 2024 ते 26 सप्टेंबर 2024 पर्यंत, प्राथमिक लाभधारक निवड 30 सप्टेंबर 2024 ते 04 ऑक्टोंबर 2024 पर्यंत, निवड झालेल्या अर्जदारांची कागदपत्रे अपलोड करणे 07 ऑक्टोंबर 2024 ते 14 ऑक्टोंबर 2024 पर्यंत, प्राथमिक निवड झालेल्य अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे 16 ऑक्टोंबर 2024 ते 21 ऑक्टोंबर 2024 पर्यंत, अंतिम निवड यादी प्रसिध्द करणे 23 ऑक्टोंबर 2024 ते 25 ऑक्टोंबर 2024 तरी जिल्हयातील भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमाती या वर्गातील लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता सदर वेबसाईडवरती ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. विलास गाडगे यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.