Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कुणाल पेंदोकर यांची काॅंग्रेस सोशल मिडीयाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १३ जानेवारी:  जिल्हा युवक कॉंग्रेसचे महासचिव तथा सामाजिक कार्यकर्ते कुणाल पेंदोरकर यांची जिल्हा काग्रेस सोशल मिडीयाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पेंदोरकर यांची नियुक्ती अखिल भारतीय कॉंग्रेस कमेटी सोशल मिडीया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार  करण्यात आली आहे.    

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कुणाल पेंदोरकर हे गेल्या अनेक वर्षापासून युवक कॉंग्रेसमध्ये कार्यरत असून त्यांनी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून महत्वाची भूमिका बजावली आहे. पेंदोरकर हे जिल्हा युवक कॉंग्रेसच्या महासचिव पदावर  कार्यरत असून युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना संघटीत करून युवकांना पक्षाशी जोडण्याचे काम करीत आहेत. ते ना. विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक असून त्यांनी ना. वडेट्टीवारांच्या मार्गदर्शनात  सामाजिक कार्य तसेच विविध उपक्रम राबवून  केवळ शहरच नव्हे तर ग्रामीण भागात युवक कॉंग्रेस अधिक बळकट करण्यासाठी महत्वपुर्ण योगदान दिले आहे.

युवक कॉंग्रेसच्या वाढीसाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन कुणाल पेंदोरकर यांची नियुक्ती जिल्हा कॉंग्रेस सोशल मिडीयाच्या जिल्हाध्यक्षपदी करण्यात आली आहे. कुणाल पेंदोकर यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात, चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र  प्रदेश सोशल  मिडीया अध्यक्ष अभिजीत सपकाळ,  प्रदेश युवक कॉंग्रेसच्या सचिव शिवानीताई वडेट्टीवार,  कॉंग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी,  युवा नेते पंकज गुड्डेवार, जेष्ठ नेते तथा जि. प. सदस्य अॅड. राम  मेश्राम, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश युवक कॉंग्रेसचे सचिव अतुल मल्लेलवार,  प्रदेश महिला कॉंग्रेसच्या सचिव चंदाताई कोडवते, जिल्हा कॉंग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भावनाताई वानखेडे, सोशल मिडीयाचे विदर्भ संयोजक सुमित लोणारे यांना दिले आहे. कुणाल पेंदोरकर यांची जिल्हा कॉंग्रेस सोशल मिडीयाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीबद्दल कॉंग्रेस, युवक कॉंग्रेसच्या व पक्षाच्या सर्व सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.