Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी निलेश सातपुते यांची नियुक्ती

निलेश सातपुते यांनी मानले आभार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

गडचिरोली, १० एप्रिल : व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी निलेश सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच याबाबतचे नियुक्तीपत्र व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड यांच्या सहिनीशी प्राप्त झाले आहे.

निलेश सातपुते हे मागील दोन वर्षांपासून पत्रकारिता करीत आहेत. तसेच ते लोकवृत्त न्यूज पोर्टल चे संपादक असून नवनविन उपक्रम हाती घेत डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न सुद्धा पत्रकार दिन कार्यक्रमातून केला. अशाच कार्याची दखल घेत व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, डिजीटल मीडिया विभाग प्रदेशाध्यक महाराष्ट्र जयपाल गायकवाड यांनी विश्वास दर्शवत संघटना बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच संघटनेची ध्येय धोरने पत्रकारांपर्यंत पोहचविण्यासाठी निलेश सातपुते यांची व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

निलेश सातपुते यांनी संघटनेच्या सर्वच मान्यवर, पदाधिकारी यांचे आभार मानले असून जिल्ह्यात संघटना बळकटीकरण व मजबूत करण्याकरिता संघटनेची ध्येय धोरणे जिल्ह्यातील डिजिटल मिडिया कार्यरत पत्रकारांपर्यंत पोहचविण्याचे काम करू असे आश्वस्त केले आहे.

त्यांच्या निवडीने सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.