Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने राज्यसरकारकडून ऑक्सिजन उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सांगली, दि. १७ एप्रिल: राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा खूप आहे, ऑक्सिजन उपलब्ध करण्याचा प्रयत्न राज्यसरकारकडून सुरू आहे. संबधीत अधिकारी आणि पुरवठादार यांच्याशी बातचीत सुरू आहे अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

रेमडीसिविर लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे नियोजन राज्यसरकारकडून सुरू आहे. ऑक्सिजनची गरज वाढली आहे. एका सांगली जिल्ह्याला दिवसाकाठी २३ टन ऑक्सिजन लागत आहे, सर्वत्र मागणी वाढल्याने बाहेरून ऑक्सिजन मिळणे फार अडचणीचे झाले आहे. ही परिस्थिती पाहता नागरिकांनी घरातच राहणे हेच योग्य आहे. आम्ही वारंवार विनंती करत आहो, ही साखळी तुटल्याशिवाय पर्याय नाही असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.