Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खा. अशोक नेते यांनी घेतला आरमोरी तालुक्यातील कोविड स्थितीचा आढावा

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आरमोरी, दि. ३ मे: गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते व आरमोरी विधानसभाचे आम. कृष्णाजी गजबे यांनी आज दि 3 मे रोजी आरमोरी तालुक्यातील कोविड च्या स्थिती चा आढावा घेतला. व कोविड ची सद्यस्थिती व वैक्सिनचा पुरवठा याबाबतची माहिती जाणून घेतली यावेळी आरमोरी चे नगराध्यक्ष पवन नारनवरे, नगर परिषद चे पाणी पुरवठा सभापती भारतजी बावनथडे, भाजपचे तालुका अध्यक्ष नंदूजी पेट्टेवार, पंकज खरवडे, भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष संगीता रेवतकर, तहसीलदार कल्याण कुमार डहाट, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, बीडीओ, पोलीस उपनिरीक्षक, व अन्य अधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी खासदार अशोक नेते यांनी कोविड चा आढावा घेतला असता  तालुक्यात 108 कोरोना बाधीत रुग्ण असून कोरोना ची संख्या वाढत आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी खासदार अशोक नेते यांनी कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना करून नागरीकांना लसीकरणाची आवश्यकता पटवुन देऊन त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले. तसेच कोविडची लस व ऑक्सिजन सिलेंडर च्या पुरवठा साठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचे निर्देश यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिले. बैठकीला अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी खासदार अशोक नेते यांनी आरमोरी ग्रामीण रुग्णालयाला दोन मिनी व्हेंटिलेटर दिले व रुग्णांवर योग्य उपचार करण्याच्या सूचना केल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.