सहायक प्राध्यापक रोहित कांबळे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार जाहीर
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार वितरण....
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि.25 : गोंडवाना विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील सहायक प्राध्यापक रोहित बापू कांबळे यांना 2019 सालचा राज्य शासनाचा शासकीय गटातील राज्यस्तरीय ‘केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार’ जाहीर झाला. रोख 51 हजार रुपये, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयामध्ये छायाचित्रकार या पदावर कार्यरत असताना त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचे हेलिकॉप्टरमधून केलेले छायाचित्रण व इतर विकासात्मक उल्लेखनीय छायाचित्रांसाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लवकरच मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.
Comments are closed.