Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हातात तलवार घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न फसला; सिंदेवाही पोलिसांची तत्पर कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सिंदेवाही (जि. चंद्रपूर) – शहरात हातात तलवार घेऊन दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकास सिंदेवाही पोलिसांनी तडाक्यात अटक केली आहे. ही कारवाई मंगळवार, १७ जून रोजी पहाटे ५ वाजता शहरात पेट्रोलिंग दरम्यान करण्यात आली. अंधाराचा फायदा घेत संभाव्य घातपातासाठी फिरणाऱ्या आरोपीकडून पोलिसांनी एक धारदार तलवार जप्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शिवराज सुनील उटलवार (वय २४) असून तो विद्यानगर कॉलनी, सिंदेवाही येथील रहिवासी आहे. तो शहरातील एका पानठेल्याजवळ संशयास्पद हालचाली करत असताना पोलिसांच्या लक्षात आला. चौकशी केली असता तो हातात तलवार घेऊन असल्याचे उघडकीस आले. घटनास्थळी त्वरित कारवाई करत त्याला ताब्यात घेण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रकरणी सिंदेवाही पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सुरु असून, या घटनेमागील हेतू व संभाव्य गुन्ह्याचा तपास केला जात आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू व उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात सफौ चंद्रभान सोनवणे व त्यांच्या पथकाने केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर घटना ही केवळ शिस्तबद्ध पोलिसिंगचेच नव्हे, तर शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्थेच्या राखणेसाठी पोलिसांची दक्षता व सजगतेचे प्रत्यक्ष उदाहरण ठरली आहे. शहरात अराजकता निर्माण करण्याच्या अशा प्रकारच्या हालचालींवर पोलिसांची नजर असल्याचे यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

 

Comments are closed.