Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा 15 ऑगस्ट जिल्हा दौरा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 14 ऑगस्ट – राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे हस्ते 15 ऑगस्ट रोजी इतर मागासवर्गीय मुला/मुलींचे वसतीगृहाचे उद्घाटन करण्यात येणार असून त्यांचा गडचिरोली जिल्ह्यातील दौरा कार्यक्रम पुढीप्रमाणे आहे.

  • 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.45 वाजता सुयोग निवासस्थान गडचिरोली येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वा. इतर मागासवर्गीय मुलींचे वसतीगृहाचे उद्घाटन कार्यक्रमास आरमोरी रोड, गडचिरोली येथे उपस्थिती.
  • दुपारी 1.45 वाजता इतर मागासवर्गीय मुलांचे वसतीगृहाचे उद्घाटन कार्यक्रमास चामोर्शी रोड, गडचिरोली येथे उपस्थिती. दुपारी 2.30 वा. हेलिपॅड पोलिस मुख्यालय येथे आगमन व अहेरीकडे प्रयाण. दुपारी 03.00 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन व मुक्काम.
  •  16 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 09.45 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथून प्राणहिता हेलिपॅडकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. प्राणहिता हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने लाहेरीकडे प्रयाण. सकाळी 10.30 ते सकाळी 11.40 वा. लाहेरी येथे आगमन व लाहेरी येथे नागरीकांसमवेत संवाद बैठक.
  • सकाळी 11.40 वा. लाहेरी येथून नारगुंडाकडे हेलिकॉप्टरने प्रयाण. सकाळी 11.45 ते दुपारी 12.45 वा. नारगुंडा येथे आगमन व नागरीकांसमवेत संवाद बैठक.
  • दुपारी 12.50 वा.नारगुंडा येथून भामरागडकडे हेलिकॉप्टरने प्रयाण. दुपारी 01.30 वा. ते दुपारी 03.00 वा. भगवंतराव आश्रम शाळा, भामरागड येथे नागरीकांसमवेत संवाद बैठक.
  • दुपारी 03.00 वा. भगवंतराव आश्रम शाळा, भामरागड येथून हेलिकॉप्टरने अहेरीकडे प्रयाण. दुपारी 03.45 वा. प्राणहिता हेलिपॅड, अहेरी येथे आगमन व निवासस्थान अहेरीकडे प्रयाण.
  • दुपारी 04.00 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन व मुक्काम.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.