भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम अजूनही अपूर्णच
प्रकल्पाचे पूर्णत्वास डिसेंबर २०२६ येण्याची शक्यता
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबईतील दादर येथील इंदू मिलच्या जागेवर तयार करण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम केवळ केवळ ४७ टक्के पूर्णत्वास गेले असून या प्रकल्प पूर्णत्वासाठीची डिसेंबर २०२५ ही डेडलाइन हुकण्याची शक्यता आहे.
इंदू मिलच्या १२ एकर जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ४५० फूट उंचीच्या स्मारकाची उभारणी केली जात आहे. यामध्ये १०० फूट उंच स्मारकाच्या पादपीठाची इमारत उभारण्यात येणार असून त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा उभारला जाणार आहे. सध्या पुतळ्याच्या निर्मितीचे काम शिल्पकार राम सुतार यांच्या कलाशाळेत सुरू आहे. पुतळ्याच्या पायथ्यापासून २३० फुटांपर्यंतच्या उंचीचे थर्माकोलच्या मॉडेलचे काम पूर्ण झाल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली. आता पुतळ्याच्या प्रतिकृतीचे काम पूर्णत्वाच्या दिशेने असून कलाशाळेत धातू आणण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मुदतवाढीनंतर काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु मुदतवाढीनंतरहि काम धीम्या गतीने सुरु असल्याने काम पूर्ण होण्यास डिसेंबर २०२६ उजाडण्याची शक्यता आहे.
हे पण पहा,
Comments are closed.