Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धोबी समाजाच्या सर्वांगीण विकासाठी समाज मंदिराचे भूमिपूजन जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते

Get real time updates directly on you device, subscribe now.

अहेरी दि ९ फेब्रुवारी :- आलापल्ली शहरातील  बजरंग चौक लगत असलेल्या   राखीव जागेत धोबी समाजाच्या सामाजिक,सास्कृतिक तसेच इतर  कामासाठी अन्यत महत्वाचे असल्याने स्थानिक अलापल्लीच्या नागरिकांची मागणी लक्षात घेवून धोबी बांधवांसाठी समाजभवनासाठी निधी उपलब्ध करून सदर समाज मंदिर च्या जागेचे  भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

धोबी समाजाच्या सामाजिक सांस्कृतीक तसेच परंपरागत असलेली  रूढी,चालीरीती यांची जोपासना करता यावी आणि समाजाच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमासाठी समाजभवन आवश्क होते मात्र जागा असून समाज मंदिर  नसल्याने अडचण निर्माण होत होती.
या साठी वेळोवेळी धोबी समाजबांधवानी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदन देवून समाजभवनाची मागणी केली असता सामाजिक उपक्रमाला पहिले दाद देवून जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला आहे त्याच जागेचे भूमिपूजन जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले असून तात्काळ कामाला सुरुवात होणारा आहे . यामुळे धोबी बांधवात उत्साहाचे वातावरण असून कित्येक वर्ष्याची मागणीची दखल पूर्ण झाली यामुळे समाधान हि व्यक्त केले जात आहे .

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.