Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तलाव खोलीकरण कामाचे भूमिपूजन जि. प. अध्यक्ष्यांचा हस्ते संपन्न

  • जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते अहेरी तालुक्यातील खमनचेरू ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या टेकुलगुडा येथे भूमिपूजन करण्यात आले.
  • परिसरातील शेतकऱ्यांना होणार सिंचनाची सोय.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली, दि. ७ एप्रिल: अहेरी तालुक्यातील खमनचेरू ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या टेकुलगुडा  येथील मामा तलावाची गेल्या अनेक वर्षापासून खोलीकरण करण्यात आलेली नव्हती. हि बाब येथील गावकऱ्यांनी जि. प. अध्यक्ष कंकडालवार यांच्या निदर्शनास आणून दिले असता, सदर कामांसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेकडून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जलसंधारण विभागाकडून निधी मंजूर करून दिली. शेवटी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याच हस्ते भूमीपूजनाचे कार्यक्रम पार पडले.    

        टेकुलगुडा येथील तलाव मागील अनेक वर्षांपासून खोलीकरण केले नसल्याने गावातील शेतकऱ्यांना बिनऊपयोगी ठरत होते. मागील दौऱ्यात येथील गावकऱ्यांनी ही समस्या जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या निदर्शनास आणून दिले असता जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे येथील नागरिक व शेतकऱ्यांना ग्वाही दिले होते. जिल्हा परिषदेच्या मागील नियोजन समितीच्या सभेत टेकुलगुडा येथील तलाव खोलीकरण कामासाठी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी संबंधित विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून दिले. जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचे टेकुलगुडा गावातील सर्व नागरिकांनी व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

        तलाव खोलीकरण झाल्यास पाण्याची साठवणूक जास्त होऊन शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल म्हणून पूरकपणे पीक घेण्यास सोईचे होईल.   

भूमिपूजन सोहळा प्रसंगी जि. प. सदस्य सुनीताताई कुसनाके यांच्या समवेत खमनचेरू ग्राम पंचायतचे सरपंचा सायलू मडावी, उपसरपंचा साईनाथ कुकुडकर, जलसंधारण उपविभागीय अभियंता इंगोले साहेब, ग्रा. प. सदस्य जीवांकला आलाम, शमा बरसागडे, कलावती कोडापे, साक्षी डोंगरे, दीपक कुसनाके, खमनचेरु चे ग्रामसेविका सदस्या गेडाम, गावातील नागरिक, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.