Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी ! संतप्त तरुणाने ईव्हीएम मशिनवरच चालवली कुऱ्हाड.

नांदेडमधील धक्कादायक घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

नांदेड, 26 एप्रिल- 

देशात सध्या विरोधकांकडून ईव्हीएम मशिनमध्ये घोळ असल्याचा आरोप केला जातो. ईव्हीएम मशिनचा गैरवापर करुन भाजपा सत्तेत येत असल्याचाही आरोप अनेकदा होतो. त्यामुळे, ईव्हीएम मतदानाला विरोध करत, मतपत्रिका छापून मतदान घेण्याची मागणीही विरोधकांनी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता संतप्त तरुणाने कुऱ्हाडीचे घाव घालून ईव्हीएम मशिनचे तुकडे केले. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्यभरात दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. मात्र, हे मतदान पाहिजे त्या प्रमाणात होताना दिसत नाहीये. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना चिंता लागली आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील जागांसाठी मतदानाचा हक्क बजावला जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिनमधील बिघाड, किरकोळ वादाच्या घटना समोर येत आहेत. आता, नांदेड जिल्ह्यातून  धक्कादायक घटना घडल्याचे दिसून आले. येथील एका मतदान केंद्रावर चक्क कुऱ्हाडीचा घाव घालून ईव्हीएम मशिनचे दोन तुकडे करण्यात आले आहेत. तर, मतदान केंद्रावरील निवडणूक कर्मचाऱ्यांवरही हल्ल्याचा प्रयत्न झाला. या घनटेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील एका शाळेच्या मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. आज सकाळी या मतदान केंद्रावर सुरळीत आणि शांततेत मतदान सुरू होतं. लोकांनी मतदानासाठी रांगाही लावल्या होत्या. पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मात्र, दुपारी अचानक एक तरुण मतदान केंद्रात घुसला आणि अचानक त्याने छोट्या कुऱ्हाडीने मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनवर प्रहार करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने मतदान केंद्रावरील मतदार आणि अधिकारी भयभीत झाले. मतदारांनी घटनास्थळावरून पळ काढला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.