Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी पर्लकोटा नदीच्या पुलाजवळ स्फोटके ठेवणारा आरोपीस गडचिरोली पोलिसांकडून अटक.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली : नुकताच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 च्या पाश्र्वभूमीवर माओवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानंाना नुकसान पोहचविण्याचा उद्देशाने भामरागड आणि ताडगावला जोडणा­या पर्लकोटा नदीवरील पुलावर काही स्फोटके पेरून ठेवली होती. ती बिडीडीएस पथकाच्या सहाय्याने सदर स्फोटकांचा शोध घेऊन पुरुन ठेवलेली स्फोटके घटनास्थळावर नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट करण्यात आले. त्या घटनेमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका इसमास काल 24/11/2024 रोजी गडचिरोली पोलीस दलाने अटक केले आहे.

संकेत नानोटी यांचे नेतृत्वात भामरागड पोलीस व सिआरपीएफचे जवान आरेवाडा रोडवर नाकाबंदी  दरम्यान त्यांना एक व्यक्ती संशयीतरित्या वावरत असतांना दिसून आल्याने, त्यास ताब्यात घेऊन अधिक सखोल चौकशी केली असता, त्याचे नाव पांडु कोमटी मट्टामी, वय 35 वर्षे, रा. पोयारकोटी, तह. भामरागड, जि. गडचिरोली असून, दिनांक 16/11/2024 रोजी भामरागड जवळील पर्लकोटा नदीवरील पुलाजवळ 01 क्लेमोर व 02 स्फोटके लावुन सुरक्षा दलाच्या जवानांना जिवे ठार मारुन त्यांची शस्त्रास्त्रे व दारुगोळा लुटण्याचे अनुषंगाने भामरागड येथे गुन्ह्रा दाखल करून  चौकशी सुरु आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्रेणिक लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते, पोस्टे भामरागड प्रभारी अधिकारी दिपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली संकेत नानोटी यांच्या नेतृत्वात भामरागड पोलीस पार्टी व सिआरपीएफच्या जवानांनी पार पाडली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.