Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी- नक्षल मध्ये चकमक, नक्षलानी लावलेले IED उद्ध्वस्त. गडचिरोली पोलिसांची छत्तीसगड सीमेवर मोठी कारवाई..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 06 जुन- तेंदूपत्ता कंत्राटदांराकडून मोठ्या प्रमाणात खंडणीत वसूल करण्यासाठी टिपागड आणि कसनसूर नक्षल दलंम कमांडर तसेच (LOS )चे सदस्य सावरगाव पोलीस मदत केंद्र अंतर्गत येत असलेल्या कुलभट्टी गावाजवळच्या डोंगरावर बैठक आयोजित केली असल्याची खात्रीशीर माहिती गडचिरोली पोलिसांना मिळताच गडचिरोली पोलीस अधीक्षक यांनी पोलीस मदत केंद्र सावरगावच्या महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवर अतिरिक्त अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वात रणनीती आखून C60 पथका सोबत शोध मोहीम राबवित असताना आधीच जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिस जवानावर अंदाधुंद गोळीबार करताच C 60 जवानांनी जशास तसे जोरदार प्रत्युत्तर देताच घनदाट जंगलाचा आणि अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी पळून गेले.

त्यानंतर घटनास्थळी सर्च ऑपरेशन राबविले असता मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचे सामान सापडले आहे. यामध्ये विद्युत वायर , बॅटरी, सोलर प्लेट्स, साहित्य आणि काही पिशव्या जप्त करण्यात पोलिसांना यश आले असले तरी बैठक स्थळी पोलीस जवानांचे नुकसान करण्या हेतू एक चार्ज केलेला आयईडी देखील ठेवण्यात आला होता. रात्रीची वेळ असल्याने गडचिरोली पोलिसांनी आज सकाळी घटनास्थळ गाठून बाम शोधक पथक मार्फत (Ops, BDDS) पाठवून लावलेला IED नष्ट केला असून जंगल परिसरात शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आलेला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.