Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एस.टी.च्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

वैनगंगा नदीच्या पुलावर वरील घटना..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आष्टी : वैनगंगा नदीवरील पुलावर आज दुपारी भीषण अपघात झाला. एस.टी. महामंडळाच्या भरधाव बसने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने नितीन खुटेमाटे (वय ३२, रा. आष्टी) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने आष्टीत शोककळा पसरली आहे.

माहूरवरून अहेरीकडे जाणारी एस.टी. बस (MH14-LX-5658) दुपारी दोनच्या सुमारास वैनगंगा पुलावरून जात असताना समोरून गोंडपिपरीकडून दुचाकीवर येणाऱ्या नितीन खुटेमाटे यांच्या दुचाकीला बसने मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी थेट बसमध्ये अडकली आणि नितीन यांचा जागीच मृत्यू झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अपघाताची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. शव आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अत्यंत शांत, मेहनती आणि सर्वांशी सलोख्याने वागणारा नितीन खुटेमाटे यांचे अचानक निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यासाठी पुढील तपास गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.