Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महापौर संदीप जोशींच्या राजीनाम्याचे भाजपकडून खंडन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. ८ डिसेंबर : विधान परिषदेच्या पदविधर मतदारसंघ निवडणुकीत पराभव झाल्यामुळे संदीप जोशी महापौर पदाचा राजीनामा देणार असल्याच्या वृत्ताचे भाजपने खंडन केले आहे.
गतवर्षी सव्वा वर्षाकरिता संदीप जोशी यांना महापौरपद देऊन निवडणुकीत उतरविण्यात आले. त्या निवडणुकीत जोशी यांची प्रचंड बहुमताने महापौर पदाची निवडणूक चिंकली. त्यानंतर त्यांनी आपली नगरसेवक पदाची हे शेवटचे सत्र असल्याची घोषणा केली होती. तेव्हापासून ते विधान परिषद निवडणुकीची तयारी करीत होते.

पदविधर मतदारसंघाच्या निवडणुकीत निवतमान आमदार प्रा. अनिल सोले यांना डावलून भाजपने जोशी यांना उमेदवारी दिली होती. परंतु काँग्रेसचे अ‍ॅड. अभिजित वंजारी यांनी पहिल्यांदाच भाजपच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारून विजय साकार केला. या पराभवानंतर जोशी यांच्या महापौर पदाच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी संदीप जोशी यांच्या राजीनाम्याचे वृत्त निराधार असल्याचेम्हटले आहे. महापौर जोशी यांनी राजीनामा दिलेला नाही. या वृत्तावर जनतेले विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चातगाव येथील मंडळ अधिकाऱ्यासह रंगी येथील तलाठी अडकला एसीबीच्या जाळ्यात.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.