Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

13 नोव्हेंबर रोजी राज्यभरात भाजपचे चुन भाकर आंदोलन..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती ११ नोव्हे:-अतिवृष्टीच्या हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून 10 हजार कोटींची मदत राज्यसरकारने जाहीर केली,मात्र ही मदत तोकडी असल्याने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये राज्य सरकारने मदत करावी अन्यथा राज्यभरात सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयात सकाळी11 वाजता चुनभाकर आंदोलन शेतकऱ्यान समवेत करू अशी माहिती भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे व भाजप प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे यांनी अमरावतीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली,सरकारने दिलेली मदत कोणत्याही शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही शासनाची मदत पोहचली नसल्याचा आरोप देखील भाजपने केला,राज्य सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालविली असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असल्याने भाजप शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले त्यामुळे 13 नोव्हेंबर पर्यंत सरकारने मदत न दिल्यास चून भाकर आंदोलन करणार असल्याचे या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.