Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोविड बाधीतांच्या नातेवाईकासाठी भाजपची नमो भोजन व्यवस्था २० दिवसापासून अविरत सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ५ जून : भारतीय जनता पार्टीच्या वतीने खा. अशोक नेते यांच्या माध्यमातून कोविड बाधीत रुग्णांच्या नातेवाईकांसाठी गेल्या २० दिवसापासून मोफत नमो भोजन व्यवस्था अविरत सुरू आहे.

लॉकडाऊन मध्ये हॉटेल्स, भोजनालय बंद असल्याने दवाखान्यातील रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाची अडचण होत होती. याची जाण ठेवून खा. अशोक नेते यांनी सामाजिक भावनेतून सेवा कार्य म्हणून नमो भोजन व्यवस्थेची सुरुवात केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

२० दिवसापासून रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत भोजन दिल्या जात आहे. काल दि ४ जून रोजी खा. अशोक नेते यांच्या हस्ते कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन दान करण्यात आले.

यावेळी आदिवासी मोर्चा चे प्रदेश संघटन महामंत्री प्रकाशजी गेडाम, शहर महामंत्री विनोद देवोजवार, भाजयुमो चे शहर अध्यक्ष सागर कुमरे, अल्पसंख्याक मोर्चा चे शहर अध्यक्ष सलीम शेख, शहर महामंत्री इमरान शेख, भाजपचे दत्तूजी माकोडे, झोपडपट्टी आघाडी चे श्यामजी वाढई, व भाजपा चे पदाधिकारी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

दिलासादायक!! 7 जूनपासून महाराष्ट्र अनलॉक, पाच टप्प्यात हटणार लॉकडाऊन!

श्रमजीवी कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना मुक्तीची शंभरी साजरी

बहुजन म्हणजे कोण : नवे संदर्भ, नवे अर्थ

 

Comments are closed.