Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मतदार नोंदणी नोंदवून ही अहेरी नगरपंचायत क्षेत्रातील नवमतदार मतदार यादीत नाही; मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी भाजपचे तहसीलदारांना निवेदन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. ५ फेब्रुवारी: राज्य निवडणूक आयोगातर्फे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी घेण्यात आलेल्या संक्षिप्त पुनर्निरीक्षण अभियानाचा अहेरी नगरपंचायत क्षेत्रात नवमतदारांना कोणताच फायदा झालेला नाही.

राज्य निवडणूक आयोगातर्फे 15 जानेवारी रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.अहेरी नगरपंचायत अंतर्गत 12 बुथावर 12 बी.एल.ओ नेमून 15 डिसेंबर2020 पर्यत नवीन अर्ज नमुना 6अ/नमुनाआठ/नमुनाआठ अ इत्यादी अर्ज भरून सादर करण्यात आले होते.
मात्र 15 जानेवारी रोजी प्रसिद्ध मतदार यादीत या अर्ज सादर केलेल्याचे नावेच समाविष्ट नाहित त्यामुळे अहेरी नगरपंचायत क्षेत्रातील 1000 ते1200 च्या जवळपास मतदारांना मतदाना पासून वंचित राहावे लागत आहे.त्यामुळे निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात आलेल अभियान नेमकं कशासाठी होत.असा प्रश्न नवमतदारांना पडत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अहेरी सह जिल्हात नगरपंचायत च्या निवडणुका येऊ घातल्या आहेत.त्यामुळे या निवडणुकीत मतदार यादीत नाव नसल्यामुळे नवमतदारांना आपला मतदानाचा मूलभूत हक्क बजावता येणार नाही.

झालेल्या प्रकाराबाबत अहेरी तालुका भाजपा तर्फे अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना निवेदन पाठवून 15 जानेवारी रोजी प्रसिद्ध यादीत नाव समाविष्ट नसलेल्यासाठी अर्ज सादर केलेल्या मतदारांची नावे तात्काळ मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यात यावे जेणेकरून हे मतदार आगामी अहेरी नगरपंचायत निवडणुकीत मतदानापासून वंचित राहणार नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.