Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

BMC Budget 2025: मुंबई महापालिकेचे 74 हजार कोटींचं बजेट सादर

इयत्ता 10 वी पर्यंत मोफत शिक्षण, 32 हजार घरे बांधणार आणि राणी बागेत विदेशी प्राण्यांची भर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई: सर्व मुंबईकरांचे लक्ष लागलेला मुंबई महापालिकेचा 2025-206 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. 2025-26 या वर्षासाठीच्या बजेटमध्ये 74 हजार 427.41 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई महापालिका बजेटमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या 59 हजार कोटी वरुन यंदाचं बजेट 74 हजार कोटींवर आलं आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा अर्थसंकल्प असून 14.19 टक्के वाढ झालेली आहे. यामध्ये मुंबईकरासांठी अनेक महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या असून आरोग्य विषयक सोयीसुविधांसाठी 7 हजार कोटींची तरतूद , तर शिक्षण सुविधांसाठी 4 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेचा 2025-26 चा अर्थसंकल्प आज 4 फेब्रुवारी 2025 रोजी मंगळवारी सादर करण्यात आला. आज सकाळी 11 वाजता बीएमसी कमिश्नर भूषण गगराणी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला, त्यानंतर आज मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पात काय मोठ्या घोषणा करणार याकडे सर्वांचंच लक्ष होतं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महापालिका अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे –

  • मुंबई महापालिकेचा 2025-26 चा 74427.41 कोटींचा अर्थसंकल्पीय अंदाज सादर करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.19 टक्के वाढ.
  • गेल्या वर्षी 2024-25 च्या बजेटमध्ये 65 हजार 180 कोटींच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या.
  • रस्ते व वाहतूक खात्याकरिता 2025- 26 या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये 5100 कोटी इतकी तरतूद
  • मुंबई मलनि:सारण प्रकल्पासाठी (सांडपाणी प्रक्रिया केंद्र) अर्थसंकल्पीय अंदाजात 5545 कोटींची तरतूद
  • सागरी किनारा रस्ता प्रकल्पाअंतर्गत उत्तर वर्सोवा ते दहिसर आणि दहिसर ते भाईंदर लिंक रोडसाठी 5707 कोटींची तरदूत
  • गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरिता 1958 कोटी इतकी तरतूद
  • मुंबई महापालिका आरोग्य खात्याचे बजेट 7379 कोटी
  • मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झोपडपट्टीतील गाळेधारकांना मुंबई महापालिका कर भरावा लागणार
  • मुंबई महापालिका शिक्षण खात्याचं यंदाच्या वर्षीच बजेट 3955 कोटी रुपये.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुंबई पर्यटनवाढीसाठी महापालिकेच्या नव्या योजना

– भायखळ्यातील राणी बागेत पेंग्वीन आणि वाघांनंतर जिराफ; झेब्रा; सफेद सिंह; जॅग्वार या विदेशी प्रजातीचे प्राणी आणणार
– मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासासाठी 25 कोटी देणार.
– संजय गांधी नॅशनल पार् च्या जमिनीखालील बोगद्यात वाघाचे शिल्प उभारणार.
– लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय उभारले जाणार आहेत.
– काळा घोडा आणि रिगल जंक्शन परिसराचा विरास केला जाणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.