Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ईडीचा कारवाईचा धडाका, आता बॉलिवूड अभिनेता आणि उद्योगपती सचिन जोशी ताब्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. १३ फेब्रुवारी:  अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने महाराष्ट्रात कारवाईचा धडाका सुरु केला आहे. राजकारण ते उद्योजकांपासून सिनेसृष्टीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात ईडीने कारवाईचा सपाटा सुरु केला आहे. ईडी अधिकाऱ्यांनी आज अभिनेता आणि उद्योगपती सचिन जोशी याला ताब्यात घेतलं आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईतील प्रसिद्ध ओमकार बिल्डर मनी लाँडरिंग प्रकरणात ही करावाई करण्यात आली आहे.

सचिन जोशी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या प्रकरणात अडकण्याची ही पहिली वेळ नाही. या अगोदरही सचिनविरोधात अंधेरी (पश्चिम मुंबई) येथील रहिवासी पराग संघवी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संघवीला 58 कोटी रुपये रॉयल्टी न दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याशिवाय 30 माजी कर्मचार्‍यांचे वेतन न दिल्याचा आरोपही त्यांच्या कंपनीवर करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त ऑक्टोबर 2020 मध्ये ड्रग्स प्रकरणातही सचिन जोशीवर कारवाई करण्यात आली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोण आहे सचिन जोशी ?

JMJ group चे मालक जगदीश जोशी यांचे सचिन हे सुपुत्र

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सचिन जोशीने टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये सिनेमांची निर्मिती केली आहे.

सचिन जोशीने श्रीलंकेतील क्रिकेट लीगमध्ये टीम खरेदी केली होती.

अजान, मुंबई मिरार, जॅकपॉट, वीरप्पन, अमावस यासारख्या हिंदी सिनेमात काम केलं आहे

ओमकार बिल्डरवर ईडीच्या धाडी

ईडीने नुकतंच जानेवारी महिन्याच्या शेवटी मुंबईतील सुप्रसिद्ध विकासक ओमकार ग्रुपच्या कार्यालयांवर धाड टाकली होती. बँकांकडून घेतलेले कर्ज आणि आर्थिक अनियमिततेच्या संशयावरुन ईडीने ही कारवाई केली होती. ईडीने आपल्या कारवाईत आतापर्यंत सायन येथील ओंकार बिल्डर कार्यालय, प्रभादेवी येथील ब्यूमोंटे अपार्टमेंट तसेच नेपियन्सी रोडवरील आशियाना बिल्डिंग येथील ओंकार ग्रुपच्या कार्यालयावर धाड टाकल्या.

अंमलबजावणी संचालनालयाने ओमकार बिल्डर ग्रुप समुहाचे अध्यक्ष कमल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना 22 हजार कोटी रुपयांच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) फसवणूक प्रकरणात अटक केली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी येस बँकेकडून 450 कोटींच्या गुंतवणुकीसह अनेक बँकांकडून हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप ओमकार ग्रुपवर आहे.

2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात ओमकार ग्रुप आणि गोल्डन एज ग्रुप ऑफ कंपनीजच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात आरोप करण्यात आला होता की, या दोन कंपन्यांनी झोपडपट्टीवासीयांच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करुन मोठा घोटाळा केला आहे. खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात ओमकार ग्रुप आणि गोल्डन एज ग्रुप ऑफ कंपनीजविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

Comments are closed.