Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ब्रेकींग न्युज : आ.संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका

तातडीने हलविले मुंबईला

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

औरंगाबाद 18 ऑक्टोबर :-  बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांचे निकटवर्ती आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. संजय शिरसाट यांना उपचारासाठी मुंबईला रवाना करण्यात आले आहे.

काल सायंकाळी त्यांच्या छातीत दुखत असल्यानं औरंगाबाद शहरातील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला रवाना करण्यात आले आहे. एअर अंबुलन्स ने संजय शिरसाट मुंबईला रवाना करण्यातआले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसांपासून संजय शिरसाट यांची प्रकृती बिघडली होती. काल दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली. सध्या संजय शिरसाट यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून संजय शिरसाट यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे . मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जातील. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे  संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी रुग्णालयात जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.