Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

टिकेपल्ली येथे वीज कोसळल्याने बैलाचा मृत्यू, शेतकऱ्यावर लॉकडाउन मध्ये कोसळले संकट

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. ११ मे : बोरी पासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या टिकेपल्ली गावातील बाबुराव दसरु शेडमाके यांच्या मालकीच्या बैलावर वीज कोसळल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला.

आज दुपारच्या सुमारास वादळी पावसासह विजांचा कडकडाट झाला. आणि अवकाळी पावसाला सुरुवात झाली. घराजवळील चिंचेच्या झाडाखाली आसरा घेत असलेल्या बैलावर वीज कोसळली. विजेची तीव्रता इतकी भयानक होती की झाडाखाली असलेल्या तनिसचा ढीग सुद्धा अक्षरशा पावसात जळून स्वाहा झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरोनाच्या महामारीत शेतकर्‍यांवर संकट असताना, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने सुरुवात होवुन बैल ठार झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अखेर सकारात्मक विचारांनी तीन आठवडे कोरोनाशी झुंज देऊन ‘ती’ परतली सुखरूप घरी

 

Petrol Diesel Price : पेट्रोल 26 पैशांनी तर डिझेल 31 पैशांनी वाढलं

ऑईल इंडियामध्ये ११९ जागांवर नौकरीची संधी

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.