Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गीरगाय जातीचे वळू ब्राझील मधून आयात करणार – पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क, दि. 17 जून :  राज्यामध्ये महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर यांच्या मार्फत राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ यांच्यासह कार्याने ब्राझील मधून शुद्धगीर वंशाचे 10 वळू जागतिक निविदा काढून खरेदी करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले, प्रसिद्ध करावयाच्या निविदाचे सर्व अत्यावश्यक प्रारुप राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर यांना उपलब्ध करून दिलेले आहे. यामध्ये ब्राझील मधून या वळूंची आयात करण्यापूर्वी केंद्र शासनाच्या सर्व आवश्यक निकषाप्रमाणे सर्वरोगमुक्त असल्या बाबतच्या, तपासण्या वंशावळीची खातर जमा (डीएनए तपासणी द्वारे) करुन खरेदी करण्यात येणार आहे. वेळूच्या मातेचे दूध १० हजार किलो प्रति वेत पेक्षा जास्त आहे. असे गीरवळू आयात करण्यात येणार आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गीरवळू पासून वीर्य रेतमात्रा तयार करून त्याद्वारे राज्यात शुद्धगीर प्रजातीचे पैदासीव्दारे शेतक-यांचे व पर्यायाने राज्याचे दूध उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.

डिसेंबर २०२१ पुर्वी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून कृतीबंध आराखडा तयार करुन वळूंची आयात करून प्रक्षेत्रवर करण्यात यावेत अशा सूचना सुनील केदार यांनी यावेळी दिल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या बैठकीत विदर्भातील नाविन्यपूर्ण व विशेष घटक शेळी गट वाटपाबाबत चर्चा करण्यात आली. सानेन शेळी आयात करणे संदर्भात एजन्सीकडून माहिती घेण्यात आली. नागपूर येथील मदरडे अरी मार्फत कार्यरत दूध प्रक्रिया व दूधभुकटी प्रकल्पाबाबत चर्चा करण्यात आली. विदर्भ आणि मराठवाड्यात दूधभुकटी प्रकल्प सुरू करण्याबाबत प्रक्रिया सुरु करण्याच्या सूचना सुनील केदार यांनी दिल्या.

या बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे प्रतिनिधी गुप्ता, हातेकर, पशुसंवर्धन विभागाचे सहसचिव मानिकगुट्टे, उपायुक्त धनंजय परकाळे, दुग्धव्यवसाय विकास विभागाचे आयुक्त तुंबाड, उपसचिव गोविल, अवरसचिव केंडे उपस्थित होते.

हे देखील वाचा  :

दूरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवास स्थानांची कामे तातडीने पूर्ण करावीत – गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई

आ. गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय पोलिसांच्या रडारवर

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.