Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

चंद्रपूर, 8 ऑगस्ट 2023 : भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयातर्फे प्रतिवर्ष “प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार” नि:स्वार्थपणे केलेल्या, अपवादात्मक शौर्य व उत्कृष्ट कामगिरी केलेल्या बालकांना दिला जातो. तसेच अपवादात्मक क्षमता असलेल्या बालकांना ज्यांनी समाजात आदर्श स्थापित केला आहे, तसेच असे बालक ज्यांचे कार्य, खेळ, सामाजिक कार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, संस्कृती व नवीन उपक्रमामध्ये व्यापक आणि समाजात दृश्यमान प्रभाव टाकलेला आहे, अशा बालकांना राष्ट्रीय स्तरावर योग्य ओळखीची गरज असून त्यांना प्रतिष्ठित “प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार” देण्यात येतो.

सन 2023-24 मध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराकरीता जे बालक भारताचे नागरिक आहेत आणि 18 वर्षे वयाच्या खालील आहेत अशी बालके पुरस्कारासाठी पात्र आहेत. पुरस्कारासाठी अर्ज स्विकारण्याचा अंतिम दि. 31 ऑगस्ट 2023 असून https://awards.gov.in या पोर्टलवर अर्ज सादर करावेत. मा. राष्ट्रपती यांच्या हस्ते एक पदक, प्रमाणपत्र व प्रशस्तीपत्र हे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जुना कलेक्टर बंगला, आकाशवाणीच्या मागे, साईबाबा वार्ड, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.