Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऑक्सिजन कधी विमानाने आणता येतो का? चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरे यांना सवाल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. १४ एप्रिल: कोविडची परिस्थिती गंभीर असताना अजित पवार दोन दोन दिवस मतदार संघात मुक्काम करतात याचा अर्थ अजित पवारांच्या पायाखालची वाळू घसरली त्यामुळे त्याची जीभ ही वारंवार घसरत आहे. त्यामुळे  आमचा उमेदवार समाधान आवताडे विजयी होणार असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला. ते पंढरपुर मध्ये पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल लाईव्ह वर बोलताना राज्यात ऑक्सिजनची कमतरता आहे. तो आणण्यासाठी केंद्राची मदत घेऊन तो विमानाने आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य ठाकरे यांनी केलं होतं यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ऑक्सिजन कधी विमानाने आणता येतो का मला काही कळतच नाही. तो महाराष्ट्रात निर्माण करावा लागेल मात्र मुख्यमंत्री हे एका पक्षाचे प्रमुख होण्यासाठी जन्माला आले मात्र पवार साहेबांनी आपल्या स्वार्थासाठी त्यांना मुख्यमंत्री केलं. पूर्वी राजे ज्या पद्धतीने वेष बदलून जनतेत फिरत होते तसे उद्धव ठाकरे यांनी पीपिई किट घालून फिरलं पाहिजे त्याशिवाय त्यांना जनतेचे प्रश्न कळणार नाहीत असा खोचक सल्ला चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

तसेच २ तारखेच्या निकालानंतर राज्यातील सत्तेला सुरुंग नक्की लागेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.