Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठाची प्राध्यापक पद भरती रद्द करा

संतोष सुरपाम यांचे कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली 7 फेब्रुवारी :- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारा प्राध्यापक पदभरतीची जाहीरात employment notice/50/2023 दि.04/02/2023 रोजी एकुन 30 पदाची जाहीरात प्रसिद्ध केली पन त्यात एकही अनुसुचित जनजाती/आदिवासी संवर्गाकरीता राखीव ठेवल्या गेली नाही. त्यामुळे ही पदभरती तत्काळ रद्द करावी अशी मागणी मार्कंडेश्वर बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार विकास संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत संतोष छबिलदास सुरपाम यांनी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि गोंडवाना विद्यापीठाने काढलेल्या जाहीराती मध्ये ईग्रजी -1, गणीत -1, रसायनशास्त्र-4,  भौतिकशास्त्र-4, कॉम्पुटर सायन्स-4, ऊपयोजीत अर्थशास्त्र -4,  मराठी-4, एमबीए-4, जनसंवाद-4, विषययाकरीत एकुन 30 पदे प्राध्यापक म्हणून भरती प्रक्रिया राबवायची आहे परंतु त्यांमध्ये एसी-1, विजे(ए)-1, एनटी(सी)-2, एनटी(डी)-1, एसबीसी-1, ओबीसी-9, ईडब्ल्यूएस- 3, व ओपन -9 पन यात अनुसुचित जनजाती/आदिवासी संवर्गाकरीता करीता राखीव एकही जागा न ठेवल्याने ही जाहीरात व प्राध्यापक पदभरती रद्द करावी,त्या सोबतच संवर्गनिहाय पदभरती न करता विषय निहाय आरक्षण देऊन पदभरती करावी अश्या आशयाचे निवेदन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे,यांना निवेदन दिले व सोबतच कुलगुरु,यांच्या मार्फतीने भारताच्या महामहीम राष्ट्रपती राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहे.व जिलाधिकारी गडचिरोली,राज्याचे ऊच्च तंत्रशिक्षण मंत्री, सचिव ऊच्च तंत्र शिक्षण विभाग मुंबई, मुख्यमंत्री मा.एकनाथ शिन्दे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेल व पोस्टद्वारे निवेदन पाठविले आहे अशी माहीती दिली आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.