२२ ऑगस्टला सर्च रुग्णालयात कर्करोग व मधुमेह विकार आरोग्य तपासणी शिबीर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली – धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात गुरुवार, २२ ऑगस्ट २०२४ रोजी कर्करोग (कॅन्सर) ओपीडी, मधुमेह (डायबेटीस/शुगर) विकार आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन कर्करोगावर उपचार घेणे महागडे ठरते. गरीब व गरजूंवर जवळच्या भागात रोगाचे निदान व ऊपचार करता यावे, याकरिता नागपुरचे कर्करोग तज्ञ डॉ.सुशील मांनधनिया सर्च रुग्णालय चातगाव येथे तपासणी करिता येणार आहेत.
Comments are closed.