Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शांतिग्राम येथील दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली : अहेरी पोलिस स्टेशन अंतर्गत व मुलचेरा तालुक्यातील शांतिग्राम जंगलपरिसरात चोरट्या मार्गाने अवैध दारू विक्री करणाऱ्यांकडून दारू जप्त करीत दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गाव संघटनेच्या महिलांच्या पुढाकारातून अहेरी पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने केली.
मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली गाव संघटनेच्या महिलांनी अवैध दारूविक्री बंदीचा निर्णय घेत शर्तीचे प्रयत्न सुरु केले व अखेर महिलांना यश मिळून गावात दारूबंदी झाली. मागील एक वर्षापासून गावातून अवैध दारु हद्द्पार झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या काळा पासून काही विक्रेत्यांनी लपून छपून पुन्हा दारूविक्री सुरु केल्याची माहिती महिलांना प्राप्त झाली. ही गंभीर बाब लक्षात येतात या विक्रेत्यांना धडा शिकविण्यासाठी मुक्तिपथ टीम व महिलांची बैठक घेऊन अहिंसक कृतीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अहेरी पोलिसांच्या मदतीने मुक्तिपथ व गाव संघटनेच्या महिलांनी जंगलपरिसरात शोधमोहीम राबविली.

पोलिसांना बघताच दोन दारूविक्रेत्यानी जंगलाच्या दिशेने पळ काढला. घटनास्थळावरून मोहफुलाची दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी दोन्ही विक्रेत्यांची ओळख पटवून गुन्हा दाखल करण्यात आला. आपल्या गावातील दारूबंदीला धक्का लावणाऱ्या कोणत्याही दारूविक्रेत्यांची गय केली जाणार नाही, असे आवाहन महिलांनी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ही कारवाई पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मंगेश वडवी, पोहवा मनोज शेंडे, पोलीस शिपाई विनोद आत्राम, महिला पोलीस शिपाई मंगला गेडाम यांनी केली. यावेळी अनिमा तरफदार (संघटना अध्यक्ष),संगिता शील (सं. सचिव), संदिपा घरामी, कल्पना मंडल, उषा देवनाथ, शिखा बिस्वास, सुमित्रा मिस्त्री, बकुल मिस्त्री, कल्पना दास, वीरांशु बिश्वास, सुजय मंडल, आशिष पोद्दार, सत्यजित रॉय, आनंद घरामी, मुक्तीपथ तालुका संघटक रुपेश अंबादे उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.