साईबाबांच्या शिर्डीत साधेपणाने श्रीरामनवमी उत्सव साजरा
- उत्सवातून भक्तांचे कोरोनविषयक प्रबोधन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहमदनगर, दि. २१ एप्रिल: स्वतः साईबाबांनी ११० वर्षांपूर्वी म्हणजे १९११ साली सुरु केलेल्या तीन दिवसीय श्रीरामनवमी उत्सवाची परंपरा यंदा दुसऱ्या वर्षीही कोरोनामुळे साधेपणाने सुरु आहे. मात्र यंदा तीन भक्तांनी स्वखर्चाने मंदिर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करुन भाविकांचे लक्ष वेधुन घेतले आहे. तसेच साई चरित्र ग्रंथाच्या आधारे कोरोनापासून बचाव करण्याचा संदेशही विद्युत रोषणाईद्वारे दिला आहे.
तीन दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवाची मोठ्या थाटामाटात सुरुवात करण्यात आली आहे. मात्र यंदाचा वर्षीही कोरोनाच्या संकटामुळे रामनवमी उत्सव भाविकां विनाच साईबाबा संस्थानला साजरा करावा लागतोय.
मात्र या रामनवमी उत्सवा दरम्यान तीन भाविकांनी स्वत:च्या खर्चातून साई मंदिराला आणि परिसराला विद्युत रोषणाई केली आहे. ही रोषणाई येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे.
साईबाबांच्या शिर्डीत रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येते आणि या उत्सवा दरम्यान भाविका अनोखे देखावे साईंच्या शिर्डीत सादर करत असतात. मात्र कोरोनामुळे साईबाबा मंदिरात भाविकांना दर्शन घेण्यास बंदी आहे.

यंदाचा वर्षी शिर्डीतील सुनील बारहाते आणि त्यांच्या दोन मित्रानी साईबाबा मंदिराला तसेच मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली आहे. या रोषणाईचे खास वैशिष्ट्ये म्हणजे साई मंदिराच्या चार क्रमांक गेट समोर एक कमान उभारण्यात आली असुन या कमानीवर “साईबाबांच्या जीवनावर आधरित असलेल्या साई चरित्रातील अध्याय क्रमांक २३ मधील…” घरी जाऊन स्वस्थ बैस ! घराबाहेर जाऊ नकोस ! राहीं निर्भय निश्चिंत मानस ! ठेवीं विश्वास मजवरी ” या ५२ नबंर ओवी तील हा संदेश थेट या रोषणाईच्या माध्यमातून सदर केला असुन हा साईबाबांचा संदेश भाविकां पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. साईबाबा हयातीत असताना हैजा नावाची महामारी आली होती आणि त्याच वेळी साईबाबांनी समस्त शिर्डीकरांना हा संदेश दिला होता.
आज जगावर आणि देशावर कोरोना महामारीचे संकट आल्याने साईबाबांचा हा संदेश या रोषनाईच्या माध्यमातून भाविकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वानी साईबाबांच्या या संदेशाचे पालन करा निश्चितच आपल्यावरील कोरोनाचे संकट दुर होईल, हीच साईचरणी प्रार्थना आपण घरी बसुन करा असे यावेळी सुनील बारहाते म्हणाले आहे.
Comments are closed.