Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भाजपा तर्फे अहेरी येथे ओबीसी राजकीय आरक्षणासाठी चक्काजाम व जेलभरो आंदोलन

भाजपा कार्यकर्त्यांच्या नारेबाजीने परिसर दणाणले, चक्काजाम झाल्याने गाड्यांची मोठी रांग..!!

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : ओबीसींचे राजकिय आरक्षण नुकतेच सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. यामुळे ओबीसींमध्ये सद्या प्रचंड असंतोष आहे, याला राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे उदासीन धोरण कारणीभूत आहे. याचे निषेध करण्यासाठी आणि ओबीसींना पूर्वरत राजकीय आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी भाजपा तर्फे आज अहेरी येथील कै. राजे विश्वेश्वरराव महाराज चौकात भव्य “चक्काजाम” व “जेलभरो” आंदोलन करण्यात आले.

यावेळी राज्य सरकार विरोधात भाजपा कार्यकर्त्यांकडून प्रचंड नारेबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी युवा नेते अवधेशराव, प्रवीणराव, भाजपा अहेरी तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, भाजपा जिल्हा सचिव विनोद आक्कनपल्लीवार, भाजयुमो जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा महामंत्री शंकर मगडीवार, भाजपा तालुका महामंत्री पप्पु मद्दीवार, मुकेश नामेवार, माजी नगराध्यक्षा हर्षाताई ठाकरे, प्राजक्ता पेद्दापल्लीवार, माजी नगरसेवक श्रीनिवास चटारे, नारायण सिडाम, संजय पोहणेकर, अभिजीत शेंडे, गुड्डू ठाकरे, दिलीप पडगेवार, दिनेश येनगठीवार, संतोष येमुलवार, विनोद जिल्हेला, राकेश कोसरे, प्रमोद भोयर, रमेश समुद्रालवार, चंद्रिकाप्रसाद गुप्ता, पोशालू सुधरी, उमेश गुप्ता, रमेश कस्तुरवार, संदीप गुम्मलवार, नुरू शेख सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

झनकारगोंदी फाट्यावर भाजपचे ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन…

मुलुंड टोल नाक्यावर आ. अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन  

आलापल्ली ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सचिवाला माहिती न दिल्याप्रकरणी २५ हजारांचा दंड तर विस्तार अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे राज्य माहिती आयोगाचे आदेश

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.