Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर ब्रेकिंग: अखेर इकोप्रो ला मिळालं लेखी आश्वासन

  • आता रामाला तलाव होणार प्रदूषण मुक्त.
  • इकोप्रो चा अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन मागे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

चंद्रपूर, दि. 6 मार्च :- रामाला तलावाच्या संरक्षणार्थ मागील बारा दिवसापासून सुरू असलेल्या इकोप्रो चा अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सात दिवसाच्या आत रामाळा तलावाचा प्रदूषण मुक्त करण्याचा प्रस्ताव मागितला आहे. या वर शासनाच्या अधिकारी कामाला लागले आहे.जिल्हाधिकारी यांच्या कडून मनपा आयुक्त राजेश मोहीते यांनी आंदोलन मंडपाला भेट देवून हे सत्याग्रह आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या मागण्यांच्या मान्यतेकरीता अन्नत्याग सत्याग्रह करून इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यासहित संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. तलाव प्रदूषणमुक्त करण्यास खोलीकरण व सौंदर्यीकरणाबाबत सोमवारी पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार रामाळा तलाव संवर्धनाची कामे दोन टप्प्यात होण्याची गरज आहे. तसा प्रस्तावसुद्धा पर्यावरण व पर्यटन मंत्रालयास पाठविण्यात यावा. मात्र, ज्या मागण्यांना घेऊन रामाळा तलाव संवर्धनाकरिता सुरू असलेले अन्नत्याग सत्याग्रह आता जनआंदोलन झाले असून, सर्वप्रथम खोलीकरण आणि नाले वळती करण्यास नाले बांधकाम करण्यास प्राधान्य देण्याची विनंती मागणी बंडू धोतरे यांनी केली होती. 

तलावातील घातक प्रदूषित घटक भूजल प्रदूषित करित असल्याने परिसरातील नागरिकांना बाधा होत आहे. खाण प्रभावित क्षेत्र 20 किमीच्या परिसरात करावयाची कामे पर्यावरण व जलस्त्रोत विषयक कामे आवश्यक आहेत. लालपेठ, माना, नांदगाव, महाकाली, रयतवारी, दुर्गापूर, पदमापूर, भटाडी, सिनाळा आदी अनेक खाणींचा परिसर आहे. 

शहरातील प्रदुषणात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. भुजलचा सुदधा अपव्यय होत आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यास अस्तित्वास असलेल्या जलस्त्रोताचे संवर्धन करणे क्रमप्राप्त आहे. याकरीता रामाळा तलावाचे संवर्धन खनिज विकास निधीतून करणे गरजेचे आहे, असे इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले होते. 

चंद्रपूर येथील रामाळा तलावाच्या स्वच्छतेबाबत पर्यावरण मंत्री @AUThackeray यांच्या अध्यक्षतेखाली  2 मार्च 2020 ला ई-बैठक तलावात मिसळणाऱ्या घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करणे व तलाव स्वच्छ करण्याबाबत लघु, मध्यम व दीर्घ स्वरुपाचा कृती आराखडा तयार करुन 7 दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.

मात्र लेखी आश्वासने जो पर्यंत मिळणार तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे स्पष्ट मत इको प्रो चे बंडू धोत्रे यांनी सांगितले , बातम्या प्रसारित झाल्या नंतर प्रशासन जागे झाले आणि रात्री साडे नऊ वाजता लेखी स्वरुपात शासना कडून पत्र देण्यात आले. त्या मुळे रामाला तलावा साठी इकोप्रो चा सुरु असलेल्या अन्नत्याग सत्यग्राह आंदोलनाची सांगता करण्यात आली .

Comments are closed.