Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्ह्यात आज ६५ जण कोरोनाबाधित तर १०९ कोरोनामुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • आतापर्यंत 23,580 जणांची कोरोनावर मात
  • ॲक्टीव पॉझिटिव्ह 861

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. 15 मार्च जिल्ह्यात मागील 24 तासात 109 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 65 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 843 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 580 झाली आहे. सध्या 861 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 32 हजार 524 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख सहा हजार 111 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात आतापर्यंत 402 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 364, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 65 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 21, चंद्रपूर तालुका सात, भद्रावती 18, ब्रम्हपुरी एक, वरोरा 16, कोरपना एक व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.