Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

1 एप्रिलपासून शहरातील बँक ऑफ इंडिया शाखेच्या कामकाजाच्या वेळेत बदल

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चंद्रपूर, 14 मार्च :- चंद्रपूर शहरात बँक ऑफ इंडियाच्या दोन शाखा कार्यरत आहे. यामध्ये बँक ऑफ इंडिया जटपुरा गेट शाखा (जिल्हा परिषद जवळ), आणि मुख्य शाखा (लक्ष्मीनारायण मंदिराजवळ) आहेत. सदर बँक शाखा 11 ते 6 या वेळेत कार्यरत असतात. परंतु, नव्या वेळापत्रकानुसार दोन्ही बँक शाखेचे कामकाज दि. 1 एप्रिल 2023 पासून सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत असणार आहे. यामध्ये 10 ते 4 वाजताच्या कालावधीत नागरीकांना बँकेचे आर्थिक व्यवहार करता येईल. तर बँकेचे अंतर्गत कामकाज सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील.

बँक शाखेच्या उक्त कार्य अवधीत बदल करण्याकरीता सक्षम अधिकाऱ्यांकडून (जिल्हाधिकारी) जिल्हास्तरीय सल्लागार समितीमध्ये प्रस्तावास मान्यता देण्यात आली. तरी, दोन्ही शाखेच्या ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व बँकेला सहकार्य करावे, असे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगडे यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.