Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

28 सप्टेंबर रोजी महिला मार्गदर्शन मेळाव्यानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल

वरोरा नाका ते प्रियदर्शनी चौक हा मार्ग सकाळी 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत बंद

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

चंद्रपूर : मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने 28 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजतापासून चांदा क्लब ग्राउंड येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळाव्यामध्ये अंदाजे 5 हजार महिला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे मेळावा असलेल्या मार्गावर रहदारी सुरळीत चालावी, रहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. याबाबत प्रभारी पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांनी आदेश निर्गमीत केले आहे.

वरोरा नाका ते प्रियदर्शिनी चौक हा मार्ग 28 सप्टेंबर 2024 रोजी 10 वाजतापासून सायंकाळी 6 वाजतापर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद राहील. तसेच सदरचा मार्ग हा “नो पार्कींग झोन” व “नो हॉकर्स झोन” म्हणून घोषित करण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात पडोली कडून शहरामध्ये जाणारी वाहतूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज – जटपुरा गेट या मार्गाचा किंवा सावरकर चौक- बस स्टॉप – प्रियदर्शनी चौक- जटपुरा गेट या मार्गाचा वापर करतील. वरिल निर्देशाचे पालन करून जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.