Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मराठा-कुणबी मुला-मुलींकरीता सनदी लेखापाल प्रशिक्षण

सारथी संस्थे मार्फत ‘सरदार सूर्याजी काकडे सनदी लेखापाल पायाभूत प्रशिक्षण उपक्रम’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, (सारथी) पुणे ही संस्था महाराष्ट्र राज्यतील मराठा, कुणबी, कुणबी- मराठा, मराठा – कुणबी या लक्षित गटाच्या विद्यार्थ्याकरिता सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी नियोजन विभागाच्या अधिपत्त्याखाली स्थापन करण्यातआलेली आहे. सारथी संस्थे मार्फत ‘सरदार सूर्याजी काकडे सनदी लेखापाल पायाभूत प्रशिक्षण उपक्रम’ योजना २०२४-२५ प्रशिक्षण तुकडी करिता अर्ज मागवण्यात आले आहेत.
सदर योजनेसाठी उमेदवार किमान ५० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असावा. अर्ज करण्यासाठी ०५ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

या योजनेत सहा महिने अनिवासी स्वरूपाचे नियमित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अधिक माहिती
सारथीच्या www.sarthi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून जास्तीत जास्त लक्षित गटातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नागपूर येथील सारथीच्या विभागीय कार्यालयातील उपव्यवस्थापकीय संचालक, तथा उपविभागीय अधिकारी नागपूर(शहर) सुरेश बगळे यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्य पोलीस दलातील आठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.