Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबईतल्या विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या चीफ बुकिंग सुपरवायझरने केली आत्महत्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. ०७ जानेवारी: मुंबईतल्या विद्याविहार रेल्वे स्थानकात एका चीफ बुकिंग सुपरवायझरने आपल्या बुकिंग कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे, आत्महत्या केलेल्या सुपर वायझरचे नाव कैलास कदम असे असून, आज सकाळी कैलास कदम हे ड्युटीवर आले असता त्यांनी आपल्या कार्यालयात चहा मागितला. चहा प्यायलानंतर त्यांनी आपल्या केबिनचे दार बंद केले होते. बराच वेळ झाला ते बाहेर आले नाही म्हणून त्यांच्या सहकाऱ्याने आवाज दिला, पण त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. दार उघडून आत बघितले असता कदम यांनी वायरचा मदतीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले. तात्काळ त्या सहकाऱ्याने याची माहिती घाटकोपर पोलिसांना दिली, घाटकोपर पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी लगेच कदम यांना राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आले.

कदम यांना राजावाडी रुग्णालयात पाठवले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी याची माहिती कदम यांच्या नातेवाईकांना दिली. कदम हे कल्याणच्या कोळसेवाडी विभागात राहत होते. नेमक कशामुळे कदम यांनी आत्महत्या केली. याचा तपास घाटकोपर पोलीस करत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.