Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई, 1ऑगस्ट 2023 ; साहित्यरत्न लोकशाहीर अणणाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातील सारसबाग येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी पुणे जिल्हा मातंग समाज व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्यावतीने आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या दुर्मिळ चित्र प्रदर्शनास भेट दिली. जिल्हा मातंग संघाच्यावतीने मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी आमदार सुनील कांबळे, पुणे जिल्हा मातंग संघाचे अध्यक्ष भिमराव साठे, सहदेव ढवरे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी शासकीय विश्रामगृह येथेही मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री  फडणवीस यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.