चिमुकल्यांना चातगावातील कॉन्व्हेन्ट मध्ये मिळणार इंग्रजीत धडे.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
धानोरा, 25 ऑगस्ट : तालुक्यातील चांतगाव येथे हिरासुका बहुउद्देशीय आदिवासी संस्था अंतर्गत उईके कॉन्व्हेन्टचे 17 ऑगस्ट 2023 ला लोकार्पण करण्यात आले.चातगाव हे आदिवासी बहुल छोटसं गडचिरोली धानोरा महामार्गावर छोटेसे ३५० घराचे आदिवासीं बहुल गाव आहे. या ठिकाणी खाजगी एक ते चार पर्यंत विद्यामंदिर प्राथमिक शाळा आहे तर पाच ते बारा खाजगी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आहे.
आजच्या आधुनिक शिक्षण घ्यायचे म्हणजे इंग्रजी येणे आवश्यक आहे. त्यासाठीच गावातील सरपंच तथा हिरसुका बहुउद्देशीय आदिवासी सस्थेच अध्यक्ष यांनी पुढाकार घेत उईके कॉन्व्हेंट ची निर्मिती करून या गावात इंग्रजी माध्यमाचे दालन उघडे करण्यात आले आहे. आज खेड्या गावातून बाहेर पडले तर गुंडी तेलगू भाषेशिवाय हिंदी मराठी इंग्रजी भाषा यावी यासाठी उईके यांचा मानस असल्याचं त्यांनी खेड्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला सक्षम करण्यासाठी इंग्रजी यावी यासाठी उईक यांनी कॉन्व्हेन्ट चे लोकार्पण केले आहे.
संस्थेचे संस्थापक सरपंच हे गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावी यासाठी प्रयत्न असताना याच संस्थेअंतर्गत सचिव म्हणून प्रवीण मळावी आहेत प्रवीण मडावी यांचे समाजकार्य या विषयात पदव्युत्तर झाले असून नुकतंच दिल्ली येथे 15 ऑगस्ट 2023 ला पंतप्रधान यांच्या दिल्ली येथील कार्यक्रमाला पाचारण केल्याने तसेच सामाजिक क्षेत्रात चांगली ओढ असल्याने गावाचा विकास तसेच विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी या शिक्षण क्षेत्रात त्यांचं मोठे योगदान आहे त्यामुळे नक्कीच या कॉन्व्हेंट निर्मितीनंतर विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे मिळण्यास सहकार्य लागणार आहे.
कॉन्व्हेंटच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष गोपाल उईके, प्रिन्सिपल प्रवीण मडावी, शिवशंकर मळावी, सुधाकर मडावी, प्रेमीला मडावी, शेषराव मसराम, पालक चंद्रशेखर पेंदाम व विद्यार्थी तसेच नागरिक उपस्थित होते.
हे पण वाचा :-
Comments are closed.