Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सचिवांच्या वाढदिवसाने सुरू झाली गडचिरोलीत चिमणीपाखरांची शाळा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

ग्रामीण आदिवासी आपले जीवन शांतपणे, संयमाने आणि निश्चयाने जगतात : डॉ. दिलीप पांढरपट्टे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली  ८ फेब्रुवारी :- ग्रामीण आदिवासी आपले जीवन शांतपणे, संयमाने आणि निश्चयाने जगतात म्हणून ते आजही खऱ्या अर्थाने निसर्गाच्या सानिध्यात राहून सर्व जगाच्या पुढे आहेत असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी गडचिरोली येथे केले. यावेळी ते म्हणाले, गडचिरोली जिल्हयासारख्या भागात जावून आदिवासी विद्यार्थ्यांसोबत जन्मदिवस साजरा करण्याची आंतरिक इच्छा आज पूर्ण झाली आहे. धानोरा येथील कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयात आज झालेला जन्मदिनाचा कार्यक्रम माझ्यासाठी अविस्मरणीय असून कोरोना नंतरच्या शाळेच्या सत्राला आजच्या कार्यक्रमाने सुरुवात होत आहे याचा आनंद आहे. दुर्गम भागात ऊन, वारा, पाऊस तसेच  कोरोना न बघता विद्यादान येथील शिक्षकांनी सुरू ठेवल्याचे मला मनस्वी समाधान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी केले. माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधीनस्त असलेल्या कार्यालयांच्या आढाव्यासाठी विदर्भ दौऱ्यावर आलेल्या  महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांनी आज गडचिरोली येथे नागपूर विभागातील  जिल्हा माहिती अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला नागपूर -अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागूल यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, प्रवीण टाके, मनीषा सावळे, सचिन अडसूळ, अनिल गडेकर उपस्थित होते. आज त्यांचा जन्मदिवस होता. त्यानिमित्ताने त्यांनी  दुपारच्या सत्रात मेंढा गावाला व धानोरा येथील आदिवासी मुलींच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयास भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. पांढरपट्टे यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी म्हणून धुळे आणि सिंधुदुर्ग येथे कार्य केले आहे. सव्यसाची लेखक, जाणिवेचे सनदी अधिकारी यासोबतच एक प्रथितयश गझलकार म्हणून ते ख्यातीप्राप्त आहेत. यंदाचा आपला जन्मदिन त्यांनी  गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये साजरा करण्याचे ठरविले होते. त्यानुसार हा उपक्रम पार पडला.

यावेळी धानोरा येथील शाळेत मुलींनी पारंपारिक रेला नृत्य करीत त्यांचे स्वागत केले. डॉ. पांढरपट्टे यांनी सर्व मुलींना यावेळी शैक्षणिक साहित्यही भेट म्हणून दिले.  मुलींशी संवाद साधताना ते म्हणाले, गडचिरोली सारख्या भागात शिक्षण घेताय म्हणून न्यूनगंड बाळगू नये. तुम्ही यापूर्वीच आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तुम्ही गुणवान आहात. त्यामुळेच ही शाळा कायम १०० टक्के निकाल देत आहे. अनेक जण यशस्वीपणे उद्योग व व्यवसायात नाम कमावत आहेत. वनांनी आच्छादित अशा निसर्गरम्य परिसरात राहूनही आदिवासी बांधव जगाच्या पुढे आहेत. येथील शैक्षणिक वातावरण व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेने ते सिद्ध होत आहे. यापुढेही खूप शिका आणि मोठं व्हा, असे आवाहनही त्यांनी यावेळी विद्यार्थिनींना केले.

यावेळी उपस्थित असलेले नागपूर व अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागूल, शिक्षणाधिकारी राजकुमार निकम, लेखा मेंढयाच्या सरपंच नंदा दुगा यांनी  महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांनी अति दुर्गम आदिवासी भागात भेट देवून वाढदिवस साजरा करण्याच्या संकल्पनेचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याद्यापिका दिपाली कुळमेथे यांनी केले. त्यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचलन शिक्षिका कीर्ती फुंडे यांनी केले तर आभार शिक्षिका श्रीमती कुथे यांनी मानले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

*मेंढा गावातील ग्रामस्थांशी साधला संवाद* :

‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या लेखा मेंढा या गावाला भेट देवून ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी माहिती घेतली. लेखा मेंढाच्या सरपंच नंदा दुगा यांनी गावाविषयीच्या कामकाजाची व ग्रामसभेबद्दलची माहिती दिली. यावेळी सचिवांनी गावातील परिसर पाहिला तसेच गोटूलला भेट देवून त्याठिकाणची प्रक्रिया समजून घेतली. तसेच गावातील तेल कांडप व चारोळी प्रकल्पास भेट देवून कामांची माहिती घेतली. लेंखा मेंढा गावात झालेल्या कार्यक्रमाला सरपंचांसह ग्रामसभेचे अध्यक्ष अलीराम हिचामी, ग्रामसभा सचिव चरणदास तोफा, नरेश कुमोटी, मनिराम दुगा, आकांक्षित जिल्हा प्रतिनिधी सुधाकार गवंडगावे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

“बैठकीच्या आदल्या दिवसी सचिव साहेबांचा वाढदिवस असल्याचे आणि त्यांना तो ग्रामीण भागात साजरा करण्याची इच्छा असल्याचे आमच्या लक्षात आल्यानंतर त्याबाबत नियोजन करण्यात आले. याबाबत शिक्षण विभागाशी संपर्क करून धानोरा येथील अतिशय दुर्गम भागातून आलेल्या मुलींसमेवत तो साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले. याआगोदर डिसेंबर मध्ये या शाळेची कोरोना काळातील घरपोच शिक्षण या विषयावरची यशस्वीगाथा राज्यस्तरावर पाठविण्यात आली होती.”- सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी गडचिरोली.

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील चिमुकल्या सॊबत वाढदिवस साजरा करतांना महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.