Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लसीकरणासाठी १८ वर्षावरील नागरिकांनी करा ऑनलाईन नोंदणी – जिल्हाधिकारी दीपक सिंगला

  • जिल्हयात अहेरी व चामोर्शी या ठिकाणी नवीन केंद्र सुरू.
  • येत्या आठवड्यात जिल्हयातील उपलब्ध साठ्यानूसार अजून लसीकरण केंद्रांमध्ये वाढ.
  • लसीकरणाबाबत गैरसमज असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ०३ मे : जिल्हयात सद्या पाच ठिकाणी १८ वर्षावरील नारिकांना लसीकरण सुरू करण्यात आले होते. आता अहेरी व चामोर्शी येथील दोन ठिकाणी लसीकरणास सुरूवात करण्यात येत आहे. या ठिकाणी लसीकरण करणेसाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक असून, नगारिकांनी आपली ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतरच लसीकरणासाठी जावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. दि.१ मे रोजी जिल्हयात पाच लसीकरण केंद्राद्वारे वय वर्षे १८ वरील नागरिकांना कोविड लस देण्यास सुरूवात झाली आहे. ऑनलाईन नोंदणी करतेवेळे आपण निवडलेल्या वेळेनुसार त्याठिकाणी उपस्थित राहिल्यास लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही. तसेच ज्या लसीकरण केंद्राची निवड आपण नोंदविली आहे त्याच ठिकाणी लसीकरण उपलब्ध होणार आहे . जिल्हाधिकारी दीपक सिंगला म्हणाले अधिकच्या लसीकरण साठ्यासाठी पाठपुरावा केला असून येत्या काळात जिल्हयातील उर्वरीत ठिकाणीही वय वर्षे १८ वरील लसीकरण केंद्र  सुरू करण्यात येणार आहेत. तसेच ४५ वयापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण ७१ ठिकाणी सुरू असून पुर्वीप्रमाणेच त्याठिकाणी लसीकरण प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

      लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी न करता नागरिक लसीकरणासाठी येत आहेत. त्यांनी आपले नाव घरूनच नोंदवावे व येताना ओळखपत्र सोबत घेवून यावे. विनाकारण बाहेर गर्दी वाढल्यास कोरोना संसर्गाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या प्रकियेचा अवलंब करावा तसेच काही अडचण आल्यास शासनाच्या टोल फ्री क्रमांक १०७५ वर लसीकरणाबाबत माहिती घ्यावी असे आवाहनही जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.

जिल्हयात अहेरी व चामोर्शी येथे लसीकरण केंद्र सुरू होणार : वय वर्षे १८ वरील नागरिकांसाठी सद्या सामान्य रुग्णालय गडचिरोली, महिला व बाल रुग्णालय गडचिरोली, पोलीस रुग्णालय गडचिरोली, प्रा.आ.केंद्र कोरेगांव वडसा व उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे सुरू होते. आता अजून दोन ठिकाणी उद्या पासून लसीकरणास सुरूवात होणार आहे. अहेरी येथील ग्रामीण रूग्णालय व आरमोरी येथील ग्रामीण रूग्णालय या ठिकाणी लसीकरणास प्रारंभ होत आहे. येत्या आठवड्यात जिल्हयातील उपलब्ध साठ्यानूसार लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. सद्या सर्वच ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी लसींचा साठ कमी पडत आहे. उपलब्ध साठ्यात वाढ होईल त्याप्रमाणे वय वर्षे १८ पुर्ण केलेल्या नागरिकांसाठी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

लसीकरण सुरक्षित असून, शंका असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधा – लसीकरणाबाबत बरेच गैरसमज समाजमाध्यमांद्वारे पसरविले जातात. लसीकरणाबाबतची नेमकी आणि विश्वासहार्य माहिती जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध असून गैरसमज दूर करण्यासाठी त्यांची मदत घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. नागरिकांनी कोविन ॲपवर, शासनाच्या टोल फ्री क्रमांक १०७५ वर, तसेच आरोग्य सेतू या ॲपवरही योग्य माहिती आत्मसात करावी. कोरोना बाबतचे लसीकरण अगदी सुरक्षित असून ते सर्व नागरिकांनी घेणे गरजेचे आहे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Comments are closed.