Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आपले आरोग्य आपली संपत्ती आहे यासाठी नागरिकांनी आरोग्याची तपासणी करून आयुष्यमान भव: व आबा या कार्डाचा लाभ घ्यावा:-खा.अशोक नेते

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली,1 ऑक्टोंबर : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त “सेवा सप्ताह पंधरवाडा” या कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी च्या वतीने स्थानिक सावित्रीबाई फुले नगरपरिषद प्राथमिक शाळा, गोकुळनगर गडचिरोली येथे महाआरोग्य तपासणी शिबिर व आयुष्यमान भारत व आबा कार्डची नोंदणी व वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी उदघाटन खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे,लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी खासदार अशोकजी नेते यांनी व्यक्त करतांना देशाचे लाडके पंतप्रधान मान.नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस देशात सेवा पंधरवाडा” कार्यक्रम सर्वत्र ठिकाणी घेण्यात येत आहे.या सेवा पंधरवाडा” निमित्ताने या महाशिबिराचा लाभ घेऊन नागरिकांनी आयुष्यमान भव: व आबा या कार्डाचा लाभ जास्तीत जास्त संख्येने घ्यावा असे आवाहन याप्रसंगी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या निमित्याने खासदार अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,लोकसभा समन्वय प्रमोद पिपरे,यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून शुभारंभ केला.याप्रसंगी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे,जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगिताताई पिपरे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,शहर महामंत्री केशव निंबोळ,विनोद देवोजवार,विवेक बैस,जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके,डॉ.सिमा गेडाम, डॉ.शिल्पा कोहळे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, लताताई लाटकर,सोमेश्वर धक्काते,देवाजी लाटकर,हर्षल गेडाम,आशिष रोहनकर,अरुण हरडे,दिपक सातपुते,संजय बारापात्रे,श्याम भाऊ वाढई, निखिल चरडे, मंगेश रणदिवे, अनिल कुनघाडकर,जनार्धन साखरे,विलास नैताम,अंकुश कुडावले,पुष्पा करकाडे,शिल्पा भोयर,वच्छला ताई मुनघाटे, नीता उंदीरवाडे,जनार्धन भांडेकर तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक,आरोग्य कर्मचारीवृंद, उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.