Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तंबाखू विरोधी दिनानिमित्त पानठेला व किराणा दुकानदारांकडून दंड वसूल

६ हजार रुपये किंमतीचा सुगंधित तंबाखू जप्त करून नष्ट करण्यात आले. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 31 मे – आरमोरी शहरात जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त (३१ मे) ‘खर्ऱ्याला नाही म्हणा-खर्रा मुक्तीची शपथ घ्या’ असे आवाहन मुक्तिपथ, एनसीडी, एनटीपीसी विभागाच्या वतीने करण्यात आले होते. आवाहनाला प्रतिसाद देत काही पानठेले बंद ठेवण्यात आले होते. सुरु असलेल्या पानठेल्या करिता आरमोरी शहरात शोधमोहीम राबवून जवळपास ६ हजार रुपये किंमतीचा सुगंधित तंबाखू जप्त करून नष्ट करण्यात आले.

आरमोरी शहरात महसूल विभाग, नगरपरिषद, एनसीडी, एनटीपीसी, पोलिस विभाग व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने शहरातील व ठाणेगाव येथील ३० पानठेले व किराणा दुकानांची तपासणी करण्यात आली. यावेळी काही पानठेल्यांमध्ये अंदाजे ६००० हजार रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू ईगल, मजा, सिगारेट जप्त करण्यात आला. सोबतच संबंधित पानठेला धारकांवर कोटपा कायद्यानुसार ५ हजार ६०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ही मोहीम तहसीलदार श्रीहरी माने, पोलिस निरीक्षक विनोद रहागंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार  मेश्राम,मुक्तिपथ तालुका संघटक विनोद कोहपरे, एनसीडी विभागाचे समुपदेशक किरण दहीकर, किशोर स्वास्थ विभागाचे सचिन जेट्टी, पोलिस नाईक रजनी पिल्लेवान, अनिता कुमरे, महसूल विभागाचे प्रतिनिधी अनिल गजभिये, नगर परिषद आरोग्य विभागाचे प्रभारी स्वच्छता निरीक्षक राजू कांबळे, मुक्तिपथ स्पार्क कार्यकर्ती दीक्षा तेलकापल्लीवार, ब्लॉक प्लेसमेंट विद्यार्थी काजल साखरकर, आरमोरी यांनी राबविली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-
https://youtu.be/8hflZfbbDIk

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.